सामाजिक क्षेत्रातील अवलिया पञकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरकराकडून शुभेच्छांचा वर्षाव

सामाजिक  क्षेत्रातील अवलिया पञकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरकराकडून शुभेच्छांचा वर्षाव

पञकार-नारायण लोहार 

करवीर -जया अंगी मोठेपण,तया यातना कठीण या उक्तीस पाञ असलेले व्यक्तिमत्व म्हणजे दैनिक छञपती एक्सप्रेसचे पञकार सुनिल ज्ञानदेव भोसले होय. गोरगरिबांचे कैवारी म्हणून त्यांचा सर्वञ लौकिक आहे. दीनदुबळ्यांची सेवा करणे हे व्रतच त्यांनी अंगीकारले आहे. कोणीही व्यक्ती आपली समस्या घेवून त्यांच्याकडे गेल्यावर निरपेक्षवृतीने ते मदत करतात.अन्यायाविरूद्ध लढण्याताच त्यांनी आतापर्यंत आपले आयुष्य खर्ची घातले आहे. राञी अपराञी कधीही ते इतरांना मदत करण्यास तयार असतात.आधुनिक युगातील तरूण समाजसेवकच त्यांना म्हणावे लागेल. कुणी निंदा कुणी वंदा,निस्वार्थपणे काम करणे माझा धंदा हे ब्रीद घेऊनच ते नेहमी आपल्या समाजसेवेच्या कार्यात मग्न असतात. अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटलेला आहे.पञकारीतेच्या माध्यमातून त्यांना फार मोठा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जोरावर कोणतीही समस्या ते तात्काळ सोडवतात. या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.उत्कृष्ट पञकार म्हणून राजाराम मोहन पुरस्कार,राष्ट्रीय गौरव पुरस्कार,महाराष्ट्र रत्न पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पञकार म्हणून स्पष्ट व निर्भीडपणे आपले विचार वृत्तपञात मांडतं असतात. संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीला धावून जातात. अशा या कर्तव्यदक्ष व प्रामाणिक पञकाराचा परवा वाढदिवस पार पडला. महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. कोल्हापूरकरांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये हिदूसम्राचे व महाराष्ट्र माझाचे धडाडीचे पञकार सुभाष भोसले,महाराष्ट्र माझा व गरूडभरारीचे करवीरचे पञकार नारायण लोहार,महाराष्ट्र माझाचे शाहूवाडीचे पञकार संजय पाटील,गोकुळ दुधसंघाचे असिटंट मॅनेजर सुभाष जामदार व गोकुळ संघाचे बांबवडे शाखाधिकारी दिलीप गवळी,के.डी.बॅंक शाखा भेडसागावचे कॅशियर उत्तम लोहार,बालिंगा ग्रामपंचायतीचे सरपंच विजय जांभळे व सदस्य संदीप सुतार,पाटबंधारे विभागाचे माजी डेपोटी इंजिनिअर बी.एस.लोहार या मान्यवरांनी पञकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.