10 मे स्वाभिमान दिवस " विविध उपक्रमाने साजरा करणार. ....*करवीर तालुका वंचित बहुजन आघाडी*

10 मे  स्वाभिमान दिवस "  विविध उपक्रमाने साजरा करणार.              ....*करवीर तालुका वंचित बहुजन आघाडी*

10 मे श्रदेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी दिवस म्हणून करवीर तालुक्याच्या वतीने विविध उपक्रमाद्वरे पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून साजरा करणार असल्याचा निर्णय आज येथे झालेल्या जिल्हा परिषद निरीक्षक, सर्कल अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विलास कांबळे हे होते.

      

कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करवीर तालुका, जिल्हा परिषद सर्कल निरीक्षक व सर्कल अध्यक्ष यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाची संघटनात्मक बांधणी, सर्कल निरीक्षक , सर्कल अध्यक्ष यांचा कामाचा आढावा घेण्यात आला. ग्रामशाखा बांधणी, पक्ष सभासद नोदणी, प्रबुद्ध भारत चे वर्गणीदार सभासद करणे व 10 मे स्वाभिमानी दिवस साजरा करणे. या बाबत ही बैठकीत चर्चा होवून निर्णय घेण्यात आला.

      

बैठकीचे आयोजन करवीर तालुकाध्यक्ष भीमराव गोंधळी यांनी केले तर पदाधिकारी यांच्या कामाचा आढावा जिल्हा महासचिव महादेव कुंभार यांनी घेतला. या वेळी करवीर तालुका उपाध्यक्ष रमेश पोवार, अर्जुन गोंधळी महासचिव , अर्जुन कांबळे सचिव, शंकर कांबळे कोषाध्यक्ष, अमर कांबळे कोषाध्यक्ष, शिवाजी कांबळे, संतोष कांबळे,सचिव यशवंत कांबळे, सारंग कांबळे, अशोक आळतेकर, विशाल ढाले, रोहित कांबळे, राजू जाधव, बापू धनगर, सुनील कांबळे आनंद कांबळे, सर्व तालुका पदाधिकारी, जिल्हा परिषद निरीक्षक, जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष, सह जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष महेश महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष तुषार कांबळे, जिल्हा सचिव विश्वास फरांडे, जिल्हा संघटक पृथ्वीराज कडोलकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल कुरणे आदी जिल्हा पदाधिकारी उपस्थिती होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष भीमराव गोंधळी यांनी केले तर आभार जिल्हा महासचिव महादेव कुंभार यांनी मानले.