गांधीनगरमध्ये 'स्वच्छ जल स्वच्छ मन'चा जागर निरंकारी मिशनतर्फे स्वच्छता अभियान

गांधीनगरमध्ये 'स्वच्छ जल स्वच्छ मन'चा जागर निरंकारी मिशनतर्फे स्वच्छता अभियान

गांधीनगरमध्ये 'स्वच्छ जल स्वच्छ मन'चा जागर निरंकारी मिशनतर्फे स्वच्छता अभियान

मुबारक अत्तार:-

जल बचाओ-कल बचाओ, स्वच्छ जल - स्वच्छ मन, स्वच्छ जल -स्वच्छ जीवन, प्रदूषित पाणी आमची हानी असा संदेश देत संत निरंकारी मिशनच्या अडीचशेवर सेवा दल महात्म्यानी स्वच्छता अभियान राबवून रविवारी येथील पंचगंगा नदी घाट, पाण्याच्या टाकीचा परिसर, सुर्वे बंधारा परिसर स्वच्छ केला.

बाबा हरदेवसिंह महाराज यांच्या प्रेरणेतून व सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संत निरंकारी मिशनद्वारा सुरू असलेल्या अमृत परियोजनेअंतर्गत देशभर स्वच्छ जल-स्वच्छ मन अभियान राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून गांधीनगर-कोल्हापूर विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. अंदर का प्रदूषण और बाहर का प्रदूषण रोकना चाहिये, हा बाबा हरदेवसिंह महाराज यांचा संदेश निरंकारी सेवा दलाच्या सदस्यांनी सर्वांपर्यंत पोहोचविला.

साईबाबा मंदिरानजीकच्या जलकुंभ परिसरापासून अभियानाला प्रारंभ झाला. स्वामी शांतीप्रकाश घाटावरील सर्व कचरा हटवून पंचगंगा नदीचे प्रदूषण होऊ नये, याबाबत कोणती दक्षता घ्यावी याचा संदेश सेवा दलातील सदस्यांनी जनतेला दिला. निगडेवाडी पंचगंगा घाट, वळीवडे पंचगंगा नदी घाट इथेही स्वच्छता अभियान राबविण्यात आले. निरंकारी मिशनचे औरंगाबाद विभागप्रमुख कन्हैयालाल डेबरा, कोल्हापूर विभागप्रमुख अमरलाल निरंकारी, सेवादल संचालक संतोष सुखवानी, घनश्याम नरसिंघाणी, गोपाल निरंकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियान राबवण्यात आले. या अभियानात सेवा दलाच्या महात्म्यांसह निरंकारी मिशनचे सदस्य सहभागी झाले. सरपंच संदीप पाटोळे, उपसरपंच पुनम परमानंदाणी व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थही सहभागी झाले.