शिवाजी विद्यापीठाच्या 19 परीक्षांचे निकाल जाहीर

शिवाजी विद्यापीठाच्या 19 परीक्षांचे निकाल जाहीर

शिवाजी विद्यापीठाच्या 19 परीक्षांचे निकाल जाहीर

सांगलीतुन आणि कोल्हापुरातुन चार गैरप्रकार भरारी पथकाकडुन उघडकीस

शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 19 परिक्षांचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आलाय.आतापर्यंत एकूण 69 पक्षांचा निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडुन देण्यात आलीय. दिवसभरात परीक्षा केंद्रावरून सांगलीतून एक आणि कोल्हापूरातुन तीन असे चार गैरप्रकार भरारी पथकाकडून उघड झालेयत.शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2022 च्या हिवाळ्या सत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा गुरुवारी सुरळीतपणे पार पडल्या. दिवसभरात बँचलर आँफ जर्नालिझम, मास्टर ऑफ जर्नालिझम, डिप्लोमा इन मास्क कम्युनिकेशन एज्युकेशन, सर्टिफिकेट कोर्स इन रशियन लैंग्वेज ,डिप्लोमा इन रशियन लैंग्वेज अशा एकूण 12 अभ्यासक्रमाच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनं महाविद्यालय आणि अधिविभागात सुरळीतपणे पार पडल्यात.