HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

चित्तथरारक मर्दानी खेळ शिवमय वातावरणात पन्हाळगडावरील तोफ गाड्यांची शोभायात्रा मोठ्या उत्साहात

चित्तथरारक मर्दानी खेळ शिवमय वातावरणात पन्हाळगडावरील तोफ गाड्यांची शोभायात्रा मोठ्या उत्साहात

शिवराष्ट्राच्या अनोख्या उपक्रमास लोटला जनसागर

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे 

कोल्हापूर : जय भवानी...जय शिवराय...असा अखंड जयघोष... फडफडणारे भगवे ध्वज... पारंपारिक वाद्याचा ठेका... चित्तथरारक मर्दानी खेळ.... अशा शिवमय वातावरणात पन्हाळगडावरील तोफ गाड्यांची शोभायात्रा मोठ्या उत्साहात झाली. 

युवराज शहाजीराजे छत्रपती, मुख्यमंत्री वैद्यकीय विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे, राधानगरी अर्बनचे अध्यक्ष उत्तम जाधव, केमिस्ट असोसिएशनचे मदन पाटील, बाबा महाडिक, शिवव्याख्याते दीपकराव करपे, प्रतापराव इंगळे, डॉक्टर विजय गावडे, शिवराष्ट्र चे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत शोभा यात्रेस प्रारंभ झाला. मिरजकर तिकटी येथून शोभायात्रेस दिमाखात प्रारंभ झाला. पन्हाळगड, कोल्हापूरसह राज्यातील शिवभक्तांची मोठी संख्या शोभायात्रेत होती. शिवभक्तिचा प्रचंड उत्साह आणि पारंपारिक वाद्याचा निनाद आसमंतात गेला. दरम्यान, पालकमंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र राज्य नियोजन महामंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी भेट देऊन कार्याचे कौतुक केले. मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे गंगावेश येथे शोभायात्रेचा समारोप झाला. यावेळी तोफ कारागीर राजाराम सुतार आणि बाळकृष्ण सुतार यांचा सत्कार झाला. पन्हाळा नगरपालिकेच्या आवारात गेले अनेक वर्ष तोफा ऊन, वारा, पावसात होत्या. या तोफांना आता न्याय मिळाला आहे. रविवारी 26 मार्च रोजी पन्हाळगडावर पन्हाळगड वासियांच्या उपस्थितीत तोफगाडे सज्ज होतील. शोभायात्रा पन्हाळगडावरील मोहीम प्रमुख शुभम पांढगळे, शितल अडसुळे, हानीपच्याचा, भुपाल शेळके, डॉ. महादेव आरगडे, संतोष जाधव, सागर इंगळे, रणजीत जाधव, राजाभाऊ भिलारे, मोहन खोत, राजेंद्र पोवार, एकनाथ घोरपडे, विनायक जरांडे, निखिल मोरे, राहुल पवार, गणेश कदम आदी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.