न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर विद्यालयात आजी-आजोबा दिन उत्साहात संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात आजी-आजोबा दिन उत्साहात संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर विद्यालयात आजी-आजोबा दिन उत्साहात संपन्न
आजी-आजोबा दिन उत्साहात संपन्न

नारायण लोहार / सिंधुदुर्ग प्रतिनिधी 

सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरुर येथे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात आजी-आजोबा दिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरूवात शालेय परिपाठाने झाली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी असल्याने प्रारंभी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला भागीरथी तवटे या आजीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

विद्यार्थ्यी-विद्यार्थ्यिनींनी आपल्या आजी आजोबांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक नारायण लोहार यांनी केले. आजी-आजोबांनी आपल्या कला सादर केल्या. भागीरथी तवटे या आजीने आपल्या सुमधूर आवाजाने फुगडीगीत सादर केले. आपल्या पूर्वी तवटे या नातीसोबत नावीण्यपूर्ण गायन केले. तसेच लक्ष्मण सावंत यांनी तालबद्दरित्या श्लोक सादर केला. 

यावेळी मुख्याध्यापक दिलीप शेवाळकर म्हणाले की, भागीरथी तवटे या आजीच्या गायनाने मला माझ्या आजीच्या जात्यावरच्या ओव्यांची आठवण झाली. सर्व आजी आजोबांचे गुलाब पुष्प देऊन मुख्याध्यापकांनी स्वागत केले. यानंतर इयत्ता 8वी विद्यार्थिंनींनी गीत सादर केले. तसेच इयत्ता 10वीच्या विद्यार्थिंनींनी व शिक्षिका अदिती ढवळे, उज्ज्वला निकम, सृती वारंग यांनी आई माझी मायेचा सागर हे गीत सादर केले. शिक्षक नारायण लोहार यांनी कोण कुणाचे नाही हे नात्यासंबंधाचे गीत सादर केले. शिक्षक समिर नाईक यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची माहिती दिली. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या आजी आजोबांना साष्टांग नमस्कार केला. शेवटी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आजी-आजोबांचे आभार शिक्षक नारायण लोहार यांनी मानले,अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.