Gold Rate Today : गगनभरारी घेतलेल्या सोन्यात मोठी घसरण, भाव किती उतरला ?

माझा महाराष्ट्र ऑनलाईन :सतत वाढत असलेल्या सोन्याच्या किमतीत दोन दिवसांत लक्षणीय घसरण झाल्याने, सर्वसामान्य खरेदीदारांसाठी पुन्हा एकदा सोनं खरेदी करण्याची मोठी संधी चालून आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम थेट भारतीय सराफ बाजारावर दिसत असून, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ही घसरण खरेदीदारांसाठी सुखद ठरत आहे.
बुधवारी सकाळी MCX वायदा बाजारात सोन्याचा जून वायदा तब्बल 0.45% नी घसरून 93,230 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. दोन दिवसांत सुमारे 540 ची घसरण झाली आहे. यामुळे तब्बल ₹1 लाखाच्या उच्चांकावर गेलेल्या सोन्याच्या भावात मोठी दिलासा देणारी घसरण नोंदली गेली आहे.
चांदी स्थिर; सोनं कमी दरात
चांदीच्या दरात कोणताही बदल नोंदवला गेलेला नाही. चांदी सध्या 97,000 प्रति किलोच्या वर ट्रेड करत आहे. मात्र सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाल्याने ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम
या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे अमेरिका-चीन व्यापार करारातील सकारात्मक प्रगती. दोन्ही देशांनी परस्पर शुल्कांमध्ये कपात करण्याचे संकेत दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की शुल्क 145% वर परत येणार नाही, यामुळे बाजार स्थिरावला.
सोनं खरेदीसाठी योग्य वेळ का?
- लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने ग्राहकांमध्ये खरेदीची मागणी वाढली आहे.
- सध्याचा दर हा गेल्या काही आठवड्यांतील सर्वात कमी दरांपैकी एक आहे.
- गुंतवणुकीसाठी आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी हे परवडणारे दर आहेत.