अभिनेता अल्लू अर्जुनला अटक
तेलंगणा : तेलंगणामध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या पुष्पा २ या चित्रपटाच्या प्रीमिअर शो वेळी अभिनेता अल्लू अर्जुन याला पाहण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू व एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. या घटनेस जबाबदार धरून या चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
पुष्पा २ या चित्रपटाचा तेलंगणातील दिलसुखनगरमध्ये ५ डिसेम्बरला खास शो आयोजित केला होता. हा शो सुरु असताना चित्रपटगृहात अल्लू अर्जुन आणि त्याचे ३० ते ४० सुरक्षा रक्षक आले. त्यावेळी अर्जुनला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत रेवती व त्यांचा मुलगा बेशुद्ध पडला. त्यांना दवाखान्यात दाखल केले असता रेवती यांचा मृत्यू झाला. रेवती यांच्या मुलावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन यांना अटक करण्यात आली आहे तर थिएटरचे व्यवस्थापक व अर्जुनच्या सुरक्षा व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.