दिल्लीत कोण जिंकणार , काय सांगतात एक्झिट पोल ?
दिल्ली : मंगळवारी संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून पोलस्टर्सनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एक्झिट पोलने अंदाज जाहीर करण्यास सुरुवात केली. बहुतेक एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजपा) विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत ३५-५० जागा मिळण्याची अपेक्षा आहे. पिमार्कने भाकित केले आहे की भारतीय जनता पक्षाला ३९-४९ जागा मिळतील. तर 'आप'ला २१-३१ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
टाईम्स नाऊ जेव्हीसीने भाजपला ३९-४५ आणि आपला २२-३१ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. सर्व पोलर्सपैकी, पीपल्स पल्सने भाजपला सर्वाधिक जागा (५१-६०) दिल्या आहेत. 'आप'ला १०-१९ जागा मिळण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, दिल्लीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.७० टक्के मतदान झाले, तर ईशान्य दिल्ली मतदारसंघात ६३.८३ टक्के मतदान झाले. दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ साठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व ७० जागांसाठी मतदान पार पडले. दिल्ली निवडणूक २०२५ ची मतमोजणी शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) हे दिल्ली निवडणूक २०२५ चे प्रमुख दावेदार आहेत. यावेळी आम आदमी पार्टी हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करत आहे.