कोर्टी नजीक अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू( घटनास्थळावरून टँकर चालकाचे पलायन)

कोर्टी नजीक अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच  मृत्यू( घटनास्थळावरून टँकर चालकाचे पलायन)

कोर्टी नजीक अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच  मृत्यू( घटनास्थळावरून टँकर चालकाचे पलायन) 

उंब्रज विभाग प्रतिनिधी/रघुनाथ थोरात

कोर्टी ता कराड गावचे हद्दीत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातार कडून कराडच्या दिशेने जाणाऱ्या साईडवर दुधाच्या टँकरच्या धडकेने मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली असून टँकर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे. दरम्यान,याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुधाच्या टँकरने मोटरसायकल चालक समाधान गुंडा कांबळे वय-42 मूळ राहणार सोलापूर सध्या राहणार उंब्रज ता कराड यांच्या युनिकॉर्न क्रमांक(MH-50 R 7718) या गाडीला जोरदार धडक दिल्यामुळे समाधान कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले. पुढील तपास उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अभय भोसले करीत आहेत