अखेर आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी प्रकरणी मागितली माफी

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केरणारे बीडचे भाजपा आमदार सुरेश धस अखेर नरमले आहेत. धस यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलीगिरी व्यक्त केली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषद घेत धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत दखल घ्यावी अशी विनंतीही केली होती. यामुळे आज आमदार सुरेश धस यांनी माळी यांची माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे धस यांनी म्हटले आहे.
प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे केली होती तक्रार
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेनंतर राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. मंत्री धनंजय मुडे यांच्याशी संबधित असलेले वाल्मिकी कराड यांचा या हत्येत सहभाग असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणावरुनच आमदार धस यांनी परळी मध्ये कसे इव्हेंट पॉलिटिक्स चालते याचे उदाहरण देताना प्राजक्ता माळी हिचे नाव घेतले होते. दरम्यान प्राजक्ता माळी हिने महिला आयोगाकडेही धाव घेतली आहे. तिने धस यांच्या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. याची दखल आयोगाने घेतली आहे.
काय म्हणाले आमदार धस ?
प्राजक्ताताई माळी यांच्या संदर्भात मी केलेल्या वक्तव्याचा गैर अर्थ काढण्यात आला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबत बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता.. मी प्राजक्ता ताई आणि समस्त स्त्रियांबाबत आदर बाळगतो.. माझ्या विधानाने जर त्यांचे किंवा कुणाचेही मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.