केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट

केज : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी  मस्साजोग येथील सरपंच संतोष देखमुख यांच्या कुटुंबांची भेट घेवून सांत्वन केले.

" माझ्या लेकराने काय गुन्हा केला होता ? आमच्यावर का एवढी दुर्दैवी वेळ आली ? आम्ही काय कुणाचे पाप केले होते ? तर माझे मालक कधी कुणाचे वाईट करीत नव्हते एक वेळ देव चुकेल पण माझे माल कधी चुकत नव्हते असे म्हणून संतोष देशमुख यांची आई आणि पत्नीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या समोर टाहो फोडल्याने अनेकांचे काळीज पिळवटून निघाले.

या वेळी  संतोष देशमुख यांची आई आणि पत्नी अश्विनी देशमुख, भाऊ धनंजय देशमुख आणि बहीण यांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी आई आणि पत्नी यांनी हसमसून आक्रोश केला. रामदास आठवले यांना त्यांनी सांगितले की, सरपंच संतोष देशमुख हे गावातील सर्व समाजातील सर्वा सोबत खूप चांगले वागत होते. सर्वांच्या सुख दुःखात ते सहभागी होत होते. तरी  त्यांच्या कुटुंबावर अशी वाईट वेळ का आली? एवढे दिवस होवूनही तपास यंत्रणेला आरोपी कसे काय सापडत नाहीत? असे म्हणून त्यांच्या समोर टाहो फोडला आणि तुम्ही गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी केली. 

यावेळी त्यांचे सांत्वन करताना रामदास आठवले म्हणाले की, ते या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी करणार आहेत. तसेच जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत तुमच्या सोबत ते आणि त्यांचा पक्ष भक्कमपणे पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांना आश्वासन दिले.

यावेळी त्यांच्या सोबत पप्पू कागदे, मिलिंद शेळके, बाबुराव कदम, दीपक कांबळे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.