आजऱ्यातील मुस्लिम समाजाचा के. पी. पाटील यांना पाठिंबा

आजऱ्यातील मुस्लिम समाजाचा के. पी. पाटील यांना पाठिंबा

आजरा (प्रतिनिधी) : आजरा, भुदरगड, राधानगरी विधानसभा निवडणूक संदर्भात हाजी आलमभाई नाईकवाडे यांच्या निवासस्थानी आजरा मुस्लीम समाजातील प्रमुख व्यक्तींची मिटिंग अब्दुलमजीद पठाण, हाजी सुलेमान दरवाजकर या जेष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आली होती. सदरच्या मिटींगमध्ये जिल्ह्य़ाचे नेते  आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रेमापोटी एकमुखाने महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील याच्या पाठीशी ठाम राहून प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला. सदरच्या मिटींगमध्ये समाजाला प्रगतीपथावर नेण्याच्या दृष्टीने विचार करण्यात आला. समाजाचे ज्वलंत प्रश्न, शैक्षणिक उन्नती, आणि सामाजिक सलोखा साधण्यासाठी बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार काम करण्याचे यावेळी ठरवण्यात आले.

यावेळी हाजी आलम नाईकवाडे, हाजी उमरान माणगावकर,सत्तारभाई ढालाइत, हुसेन दरवाजकर, अब्दुलरहिमान लमतुरे, ॲड. जावेद दिडबाग, अश्कर लष्करे, बशीर शिडवणकर, रसूल तकीलदार, जब्बार तकीलदार, हाफिज इरफान लाडजी, हाजी शौकत दरवाजकर, अब्दुलअझीझ दरवाजकर, न्यामत पिरखान, साजीदभाई खातीब, अब्दुलअझीझ पठाण, कलाम तकीलदार, नासीर ढालाइत, अब्दुल माणगावकर, जावेद पठाण, इस्माईल शेख, इकबाल हिंग्लजकर, मन्सूर हिंग्लजकर, नाजीम नाईकवाडे, नावीद लमतुरे, शम्स तकीलदार, कैफ हिंग्लजकर, मोईन शेख, अनिस नाईकवाडे, फैझ मिराभाई, अमीर खेडेकर, अरिफ मुल्ला, इत्यादी समाजातील प्रमुख तसेच गडहिंग्लज मधुन अरिफ तांबोळी, समीर राऊत, जमीर मुल्ला, जोएब मणेर, युनूस नंणदीकर उपस्थित होते.