आ.सतेज पाटील केली झूम प्रकल्पाची पाहणी करत अधिकाऱ्यांना दिल्या सक्त सूचना
कोल्हापूर प्रतिनिधी:-
मुबारक आत्तार
गेल्या काही दिवसांपासून कसबा बावडा परिसरातील झूम प्रकल्पातील कचऱ्याला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. आगीमुळे प्रचंड धूर निर्माण होत असल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने आज विधान परिषदेचे गटनेते तसेच आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी झूम प्रकल्प येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित असणाऱ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कचऱ्याला आग लागू नये याबाबत तसेच इतर आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त रविकांत अडसूळ, आरोग्य निरीक्षक विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, उप शहर अभियंता रमेश कांबळे,अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, माजी नगरसेवक संदीप नेजदार, राजेश लाटकर, सामाजिक कार्यकर्ते सागर येवलुजे, संजय लाड यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी व देवार्डे मळा परिसरातील नागरिक उपस्थित होते.