HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शोरूम फोडून 16 लाखांची रोकड चोरीस

शोरूम फोडून 16 लाखांची रोकड चोरीस

कोल्हापूर प्रतिनिधी मुबारक आत्तार 

राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव येथील टाटा कार शोरूममध्ये शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास घुसत चौघा चोरट्यांनी 16 लाख 56 हजार 480 रुपयांची रोकड चोरून नेली. दिवसरात्र वर्दळ असलेल्या महामार्गावर आणि सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षक तैनात असूनही झालेल्या चोरीमुळे परिसरात खळबळ माजली आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी तपासासाठी श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञ पथकाला बोलाविले होते. पथकातील श्‍वान शोरूम परिसरातच घुटमळले.गोकुळ शिरगाव येथील युनिटी मोटर्स प्रा. लिमिटेड या टाटा कार शोरूममध्ये कंपनीच्या विविध श्रेणीच्या मोटारींची विक्री होते. तेथेच सर्व्हिस सेंटरही आहे. विक्री आणि सेवा या दोन्ही विभागांसाठी एकत्रित कॅशियर केबिन आहे. शुक्रवारी (ता. 5) दिवसभराची रोकड व धनादेश कॅशियर केबिनमध्ये ठेवण्यात आली होती. शनिवारी पहाटे पाचच्या दरम्यान या केबिनमध्ये सुरक्षा रक्षक तैनात होते. चोरट्यांनी पाठीमागील कुंपण भिंतीवरून शोरूममध्ये प्रवेश केला आणि थेट कॅशियर केबिनकडे आपला मोर्चा वळविला. दरवाजा उचकटून कॅशियर केबिनमध्ये प्रवेश केला. तेथील ड्रॉवरमधील सर्व रोकड घेऊन चोरट्यांनी पलायन केले.

सुरक्षारक्षक, महामार्गावरील वर्दळ, सीसीटीव्ही कॅमेरे व पारदर्शक काचेच्या शोरूम मधून इतकी मोठी रक्कम चोरीस गेली. त्याची सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान चोरट्यांच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत.अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे व गोकुळ शिरगाव ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश माने यांनी घटनास्थळाची पाहणी केली.श्‍वानपथक परिसरातच घुटमळलेचोरीच्या ठिकाणी श्‍वानपथक तसेच ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते; परंतु श्‍वानपथक कुंपणाच्या परिसरातच घुटमळले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.