HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

निवारा ट्रस्ट अटकपूर्व जामीन फेटाळला

निवारा ट्रस्ट अटकपूर्व जामीन फेटाळला

कोल्हापूर प्रतिनिधी मुबारक आत्तार 

तिघा संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला ‘निवारा ट्रस्ट’ फसवणूक प्रकरण कोल्हापूर, तब्बल 22 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी निवारा ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा जोशी- भोसलेसह अन्य दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला. संशयित आरोपी असलेल्या तिघांना आता केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.निवारा ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा अजित जोशी-भोसले (रा. सिल्व्हर आर्च अपार्टमेंट, राजारामपुरी, तिसरी गल्ली), राहुल रमेश भोसले (रा. पूजाप्रिया पार्क, उचगाव, ता. करवीर) आणि भरत गाठ (रा. शरद इन्स्टिट्यूटजवळ, यड्राव रोड, इचलकरंजी) यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग ३) एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांच्या कराराबाबत भोसले हिच्याकडे मागणी केली होती. त्याचीही पूर्तता तिने केली नाही. तसेच तिने दिलेले धनादेशसुद्धा वटले नाहीत. दिलेल्या बॅंकेतील पावत्याही खोट्या असल्याचे गुंतवणूकदारांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला. 

संशयित आरोपींना अटक होण्याची भीती असल्यामुळे पूजा जोशी- भोसले हिच्यासह तिघांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले. त्यानंतर त्यांना आठ मे पर्यंत २२ लाख ३७ हजार रुपयांची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यासह अन्य अटीही घातल्या होत्या. त्यामुळे त्यांची अटक आठ मे पर्यंत टळली होती. संशयित आज न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यांची बाजू वकिलांनी मांडली. मात्र, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संशयितांचा अटकपूर्व जामीन न्यायाधीश तांबे यांनी फेटाळला.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.