जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
राधानगरी धरणात 8.30 टीएमसी पाणीसाठा

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आज सकाळी 7 वाजता आलेल्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून धरणात 8.30 टीएमसी पाणीसाठा आहे. 



पुढील बंधारे पाण्याखाली :



पंचगंगा नदीवरील - शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ.

भोगावती नदीवरील - शिरगाव, तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.

कासारी नदीवरील - यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कंटे, वालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे, करंजफेण व कुंभेवाडी.

हिरण्यकेशी नदीवरील - सुळेरान, दाभीळ, साळगांव, चांदेवाडी, ऐनापूर, हरळी, गिजवणे, निलजी व खणदाळ.

घटप्रभा नदीवरील - पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानर्डे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी.

वेदगंगा नदीवरील - निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली, गारगोटी, म्हसवे व शेणगांव.

कुंभी नदीवरील - कळे, शेनवडे, वेतवडे, मांडूकली, सांगशी व असळज.

वारणा नदीवरील - चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी, कोडोली, खोची, शिगांव व मांगले सावार्डे.

कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगांव, सवते सावर्डे व सरुड पाटणे.

ताम्रपर्णी नदीवरील - कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकरे, न्हावेली,  कोवाड, माणगांव  व ढोलगरवाडी.

दुधगंगा नदीवरील - दत्तवाड,  सुळकुड,  सिध्दनेर्ली व बाचणी.

धामणी नदीवरील -  सुळे व आंबर्डे.

तुळशी नदीवरील - बीड व आरे. असे 81 बंधारे पाण्याखाली आहेत.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे : 

राजाराम 40.8 फूट, सुर्वे 38.8 फूट, रुई 68.9 फूट, इचलकरंजी 63.6, तेरवाड 56.5 फूट, शिरोळ 50.6 फूट, नृसिंहवाडी 50.6 फूट, राजापूर 37.4 फूट तर नजीकच्या जिल्ह्यातील सांगली 18.9 फूट व अंकली 24.10  फूट अशी आहे.