कौशल्यप्राप्त आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवणे काळाची गरज- प्रा.एस.पी.चौगले

कौशल्यप्राप्त आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवणे काळाची गरज- प्रा.एस.पी.चौगले

वाकरे (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांना महत्त्व येणार असून भविष्यात कौशल्यप्राप्त व गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवणे ही काळाची गरज आहे, त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन कुंभी कासारी बँकेचे संचालक प्रा.एस.पी.चौगले यांनी केले.

           वाकरे येथील विद्यामंदिरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर अनिल शिंदे (कॅनडा) आणि स्नेहलता युवराज पाटील यांच्याकडून साऊंड सिस्टिम प्रदान कार्यक्रमास प्रा.चौगले प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पांडुरंग कुंभार होते. निवृत्त सुभेदार विलास पाटील यांनी "करिअरच्या वाटा" या विषयावर बोलताना विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार सैन्यदलात नोकरीच्या संधी असल्याचे सांगून देश सेवेबरोबरच केंद्र शासनाची नोकरी मिळत असते, त्यामुळे विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सैन्य दलात करिअर करावे असे आवाहन केले.

            बँक ऑफ बडोदाच्या मॅनेजर स्नेहलता पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द असावी आणि त्यांची शारीरिक क्षमता चांगली असणे गरजेचे असल्याचे सांगितले.

           प्रास्ताविक राजेंद्र तौंदकर तर आभार एम.एस. चव्हाण यांनी मानले.मुख्याध्यापक कुंभार,माजी उपसरपंच शारदा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वनिता पाटील,माजी अध्यक्ष शहाजी पाटील,सदस्य नागेश शिंदे,स्वप्नाली येरूडकर, जयश्री बिरंजे,दिपाली चौगले, प्रियांका शिंदे,ग्रा.पं.सदस्य लखन पाटील,विजय पाटील,किशोरी मोरे, संदिप कांबळे,अमर पाटील,शिक्षक सुभाष पाटील,कृष्णात भोसले, संजय पाटील, सोनाली धुतुरे,शामल सातपुते, नायकवडे,मनस्वी बुरुड, सुतार,विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.