टँकरच्या धडकेत एक जागीच ठार

टँकरच्या धडकेत एक जागीच ठार

 करवीर प्रतिनिधी : खुपीरे येथील बल्क सेंटर मधील दूध आणण्यासाठी आलेल्या टँकरने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत मोटारसायकल वरील युवक जागीच ठार झाला .

कृष्णात खेमराज बेगडा वय ३० मूळ गाव रत्नागिरी सध्या रा. महादेव प्रसाद हॉटेल, दोनवडे ता करवीर असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघातस्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, मृत युवक महादेव प्रसाद हॉटेल, दोनवडे येथे कुक म्हणून काम करतो. खुपीरे ग्रामीण रुग्णालयातील कार्यरत मावस भावाकडे तो आला होता. सकाळी ८ च्या सुमारास तो दोनवडे येथील हॉटेल कडे निघाला असता कोल्हापूरकडून येणाऱ्या गोकुळसाठी दूध आणणाऱ्या टँकरने एम एच ०९ जीजे ४१४९ ने त्याला सामोरा समोर धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. टँकर चालक पळून गेला असून अधिक तपास करवीर पोलीस करीत आहेत. अपघाताचे दृश्य इतके विदारक होते कि लोक हळहळ व्यक्त करीत होते.