HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून महिलांसाठी उभारली जाणार स्वच्छतागृहे

कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून महिलांसाठी उभारली जाणार स्वच्छतागृहे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांनी महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वोलू या नाविन्यपूर्ण संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारातून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानपूर्वक सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. सद्यस्थितीत अनेक शहरांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे महिला वर्गाची प्रचंड कुचंबणा होते. कृष्णराज महाडिक यांनी, ही समस्या ओळखून त्यावर  उपाय योजना करण्याचे ठरवले आणि वोलू या भारतातील पहिल्या व्यासपीठाशी सामंजस्य करार केला. 

प्रत्येक महिलेला स्वच्छतेचा आणि सन्मानाचा हक्क असावा, या विचारातून स्वच्छता गृहांची उभारणी केली जाईल. त्यातून महिलांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडेल, असा विश्‍वास कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला आहे. वोलू तंत्रज्ञानाचा वापर करून, सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुरक्षा, निगराणी, काटेकोर स्वच्छता, याबाबत लक्ष दिले जाईल. वोलू ही एक सामाजिक चळवळ असून,  तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि महिलांच्या आत्मसन्मानासाठी काम करते. 

विशेष म्हणजे स्वच्छतागृहांची माहिती व्हावी, यासाठी विशेष ऍपची निर्मिती केली जाईल. त्यामुळे महिलांना जवळची स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहांची माहिती मिळेल. आजही हजारो महिलांना योग्य स्वच्छतागृह नसल्यामुळे त्रास सहन करावा लागतो. पण आता कृष्णराज महाडिक यांनी, महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी आणि सुविधेसाठी कृतीशिल पाऊल उचलले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.