HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

वटपौर्णिमेचा उत्सव मालिकांमध्ये ; 'शिवा' च्या प्रोमोवर प्रेक्षकांनी का.. ? केला संताप व्यक्त

वटपौर्णिमेचा उत्सव मालिकांमध्ये ; 'शिवा' च्या प्रोमोवर प्रेक्षकांनी का.. ? केला संताप व्यक्त

मुंबई - आज वटपौर्णिमा साजरी केली जात आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालतात आणि सात जन्मी हाच नवरा मिळावा यासाठी प्रार्थना करतात. महिलांसाठी हा सण अत्यंत विशेष आणि उत्साहपूर्ण असतो. त्यामुळे या सणाचा उत्सव छोट्या पडद्यावरही मोठ्या प्रमाणात दाखवला जातो.

स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये नुकतेच ‘महावटपौर्णिमा स्पेशल’ एपिसोड प्रसारित झाले, ज्यामध्ये १५ नायिका एकत्र येऊन सण साजरा करताना दिसल्या. आता झी मराठीवरील मालिकांमध्येही वटपौर्णिमेचा प्रसंग दाखवण्यात येत आहे. विशेषतः ‘शिवा’ या लोकप्रिय मालिकेचा एक प्रोमो सध्या चर्चेत आला आहे तोही नकारात्मक कारणांमुळे. या प्रोमोनुसार, शिवाचा पाय मोडल्यामुळे ती पूजा करण्यासाठी येत नाही, यावरून कीर्ती आणि शिवाची बहिण तिला बदनामीच्या उद्देशाने बोलत असतात. मात्र, नाट्यमय ट्विस्टमध्ये शिवा आपल्या आशु सोबत बाईकवरून एन्ट्री घेते आणि बाईकवरच वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या मारते. हा सीन पाहून प्रेक्षक मात्र नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर या प्रोमोवर प्रचंड टीका होत आहे. 

https://www.facebook.com/watch/?v=741424494886592 

अनेकांनी म्हटलंय की, "अशा प्रकारे हिंदू सणांची थट्टा करणे योग्य नाही." काहींनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे, "हिंदू सणांची हेटाळणी करणं थांबवा," तर काहींनी म्हटलं, "हेच बघायचं राहिलं होतं...". काही नेटकऱ्यांनी मालिकेतील दिव्या या पात्रावरही नाराजी व्यक्त करत लिहिलं आहे की,  "तिला फक्त बहिणीच्या संसारात काड्या घालण्यासाठीच ठेवलंय का?"

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.