आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर नंदवाळ वाहतूक व्यवस्था 'या' प्रमाणे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे नंदवाळ या ठिकाणी ६ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त भाविकांची व त्यांच्या वाहनांची फार मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. कोल्हापूर शहर ते नंदवाळ अशी पायी दिंडी/ पालखी सोहळा तसेच या दरम्यानचे मार्गावर संकल्पसिध्दी मंगल कार्यालय, पुईखडी या ठिकाणी रिंगणसोहळा पार पडतो. दरम्यानचे मार्गावर मोटर वाहनांची वाहतुक सुरळित ठेवण्याकरीता व नागरिक, पादचारी यांना सुरक्षितता प्रस्थापित व्हावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता सदर मार्गावरील वाहतूक वळविणे, प्रवेश बंद करणे, पार्किंग ठिकाणची व्यवस्था करणे आवश्यक असलेने पालखी/पायी दिंडीचे खालील नमुद मार्गावर (शासकीय व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळून) प्रवेश बंद करणे व तेथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत पोलीस अधीक्षक , कोल्हापूर यांनी निर्देश जारी केलेले आहेत.
पायी दिंडी पालखीचा मार्ग :- विठ्ठल मंदिर मंगळवार पेठ उभा मारूती चौक राजकपूर पुतळा क्रशर चौक-नवीन वाशी
नाका-पुईखडी- वाशी गावी- नंदवाळ
अ) वाहतुकीचे वळविण्यात आलेले मार्ग :-
(शासकीय व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळून)
०१) वाशी पेट्रोलपंप (हजारे पंप) ते खत कारखाना ओढयापर्यंत सर्व प्रकारच्या दुचाकी, चारचाकी, जिप, टेंपो या वाहनांना रहदारीच्या रस्त्यावर उभा करण्यास मनाई करण्यात येत आहे.
०२) कोल्हापूर कडून राधानगरी मार्गे कोकणाकडे जाणा-या व येणा-या एसटी बसेस व अवजड वाहने कळंबा-इस्पुलीं-शेळेवाडी-परितेफाटा-भोगावती मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
०३) कोल्हापूर ते राधानगरी जाणा-या व येणा-या एसटी बसेस तसेच सर्व प्रकारचे वाहनांना रिंगण सोहळा होवून नंदवाळकडे मार्गस्थ झालेनंतर पायी दिंडी/पालखी ही नंदवाळ फाटयातून आत जाईपर्यंत कोल्हापूर ते भोगावती रोड तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येईल.
०४) राधानगरी कडून कोल्हापूरकडे येणारी हलकी चारचाकी वाहने (कार व जीप) हळदी-कुई-इस्पुलीं मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
०५) कोल्हापूर ते रंकाळा एसटीस्टैंड ते राधानगरी जाणा-या एसटी बसेस कळंबा, इस्युलीं मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
०६) कोल्हापूर ते रंकाळा एसटीस्टैंड ते राधानगरी येणा-या एसटी बसेस हळदी, कुर्ड इस्युलीं मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
ब) वाहतुकीकरीता बंद करण्यात आलेले मार्ग :-
०१) वाशी नंदवाळ फाटा ते नंदवाळगावी जाणारा मार्ग सर्व वाहनांकरीता नंदवाळ फाटा येथे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.
०२)जैताळ फाटा ते नंदवाळगावी जाणारा मार्ग सर्व वाहनांकरीता जैताळ फाटा प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.
०३) भिमाशंकर मंदिर फाटा ते नंदवाळगावी जाणारा मार्ग सर्व वाहनांकरीता प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.
क) पार्किंग ठिकाणे :-
०१) खत कारखाना (वाशी नंदवाळा फाटा येथून जाणारे भाविकांचे वाहनांकरीता पार्किंग ठिकाण)
०२) चोरगे महाविदयालय (जैताळ फाटा येथून जाणारे भाविकांचे वाहनांकरीता पार्किंग ठिकाण)
गिरगांव फाटा (भिमाशंकर मंदिर फाटा येथून जाणारे भाविकांचे वाहनांकरीता पार्किंग ठिकाण)
वरील निर्देश हे ६ जुलै रोजी पहाटे ०५.०० वा. सुरू होवून ते पालखी सोहळा समाप्त होईपर्यंत लागू राहतील. तरी शहर वाहतूक शाखा, कोल्हापूर यांचे वतीने सर्व नागरिक / वाहनचालक यांना आवाहन करण्यात येते की, सदर निर्देशांचे अनुशंगाने वाहतुक मार्गाचा अवलंब करावा.