केआयटी च्या 61 विद्यार्थ्यांची कॅम्पस मधून निवड; आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग
कोल्हापूर प्रतिनिधी : केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयात २०२३-२४ शैक्षणिक वर्षात ई. अँड टीसी विभागातील ६१ विद्यार्थ्यांची निवड १६ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये झाली.
कंपन्यांची नावे व निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कंसात - सेंसाटा टेक्नॉलॉजी (४), वायनम ऑटोमेशन सव्हींसेस प्रा. लि (४), टाटा पॉवर (६), व्हर्तीव्ह एनजों प्रायव्हेट लिमिटेड (५), नॉर ब्रेम्सी (३), वेलमेड लॉकिंग सिस्टीम (१), क्लाऊड फोर सी (५), हेक्झावेअर टेक्नॉलॉजी (१), विप्रो पारी (१६), टीसीएस (इंटर्नशिपकरिता) (२), एल्कॉम इंटिग्रेटेड सिस्टीम (६), केदार इंडस्ट्रीज, स्क्वेअर याझर्स, जे स्टॅप, एन. प्रो-पुणे, सस्टर टेस्ट सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड (८). निवड प्रक्रियेत अॅप्टिट्यूड टेस्ट, तांत्रिक मुलाखत, वैयक्तिक मुलाखत, सामूहिक चर्चा या आधारे विद्यार्थ्यांची निवड झाली. निवडलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी ५ लाखांचे पॅकेज कंपन्यांनी जाहीर केले आहे. द्वितीय सत्राच्या सुरवातीपासून प्रत्येक सुटीत अभ्यासाव्यतिरिक्त विभागाने घेतलेल्या मुलाखती व प्रात्यक्षिकांचा सराव व सादरीकरणाच्या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढून फायदा झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
यावेळी ट्रेनिंग प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. अमित सरकार, ई अँड टीसी विभागातील ट्रेनिंग प्लेसमेंटचे समन्वयक प्रा. विवेक देसाई, सह-समन्वयक प्रा. एकनाथ पाटील, विभागप्रमुख डॉ. वाय. एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, रजिस्ट्रार डॉ. मनोज मुजुमदार, संस्थाध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले व अन्य विश्वस्तांनी अभिनंदन केले.