जातीचा दाखला काढण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचा होणारा मनस्ताप थांबवा-

जातीचा दाखला काढण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचा होणारा मनस्ताप थांबवा-

कोल्हापूर (प्रतिनिधी) : यंदाचे शैक्षणिक वर्ष जून जुलै मध्ये चालू होत आहे. शाळा किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी लागणाऱ्या जातीचे दाखले ,नॉन क्रिमिलियर दाखला ,रहिवासी दाखला ,उत्पन्न दाखला या दाखल्यांचे वितरण संथ गतीने चालू असल्याच्या तक्रारी आमच्या पर्यंत पालकांनी केल्या आहेत. विद्यार्थी व पालकांचा होणारा मनःस्ताप पाहता,  सदरचे दाखले लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची सूचना आपल्या मार्फत संबंधित विभागांना द्यावी. त्याच प्रमाणे संबंधित दाखल्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करावी. अशी मागणी आम्ही शिवसेना-युवासेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांचा वतीने निवासी  उपजिल्हाधिकारी संजय तेली यांचा कडे केली.

यावेळी त्यांनी या बाबत ची शिबिरे लवकरात लवकर घेतली जातील असे आश्वासन शिष्ट मंडळाला दिले. यावेळी युवासेना जिल्हाधिकारी मंजित माने, शहर अधिकारी  योगेंद्र माने , संतोष कांदेकर, शहर समन्वयक बंडा लोंढे, माधुरी दळवी, कुणाल आदमाने, बॉबी फर्नांडिस, गणेश लोहार,विराज जांभळे आदी उपस्थित होते.