HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कॉ. सिताराम येचुरी यांच्या निधनानिमित्त इंडिया आणि महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी शोकसभा

कॉ. सिताराम येचुरी यांच्या निधनानिमित्त इंडिया आणि महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी शोकसभा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीपीएमचे सरचिटणीस कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्समध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधना निमित्त रविवारी 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे इंडिया आणि महाविकास आघाडीच्या शोकसभेचे आयोजन केले आहे. 

डाव्या विचारसरणीचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले येचुरी यांनी 2005 ते 2017 या कालावधीत 12 वर्षे राज्यसभा खासदार म्हणून काम केले. त्यांनी प्रकाश करात यांच्यानंतर 19 एप्रिल 2015 रोजी विशाखापट्टणम येथे झालेल्या 21 व्या पक्षाच्या CPI(M) च्या पाचव्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी संयुक्त विरोधी पक्षाच्या इंडिया ब्लॉकमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि ते काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षांचे लोकसभा नेते राहुल गांधी यांच्या राजकीय मार्गदर्शकांपैकी एक मानले गेले होते.गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. सीताराम येचुरी 72 वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंडिया आणि महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी 15 सप्टेंबर सकाळी 11 वाजता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे शोकसभा आयोजित केली असून या शोकसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.