*शाहूवाडी पन्हाळा वासिया सेवा संघाच्या वतीने १५० गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न. विलास पाटील यांना 'शाहूवाडी पन्हाळा रत्न

*शाहूवाडी पन्हाळा वासिया सेवा संघाच्या वतीने १५०  गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न.  विलास पाटील यांना 'शाहूवाडी पन्हाळा रत्न

पत्रकार- सुभाष भोसले

  कोल्हापूर: शाहूवाडी पन्हाळा वासीय सेवा संघाच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील १५० हून अधिक गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. इयत्ता दहावी, बारावी गुणवंत तसेच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण, शिष्यवृत्ती प्राप्त व खेळाडू यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.ट्रॉफी, सनगर गुरुजी शिष्यवृत्ती, पुस्तक या स्वरूपात गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. शाहूवाडी- पन्हाळा रत्न पुरस्काराने आरुळ गावचे सुपुत्र व लोकशांती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक श्री. विलास पांडुरंग पाटील यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले. मानपत्र, गौरव चिन्ह, कोल्हापुरी फेटा, शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. मानपत्र वाचन शिवाजी पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकुमार नलगे होते. प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखा) स्वाती गायकवाड या होत्या.याप्रसंगी प्रमुख उपस्थिती शिक्षक नेते दादासाहेब लाड, सेवानिवृत्त नौसेना अधिकारी एन. डी.चाळके, सुवर्णकार दत्तात्रय पोतदार, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी .लाड, लोकशांती क्रेडिट सोसायटीचे संस्थापक विलास पाटील, डॉ. टी. एस कडवेकर, शिवाजी पाटील,ज्ञानदेव पाटील, कोजिमाशि पतसंस्था चेअरमन बाळ डेळेकर,संचालक प्रकाश कोकाटे,उत्तम पाटील,मनोहर पाटील , राजाराम शिंदे,शाहूवाडी पन्हाळा सेवा संघाचे अध्यक्ष अनिल चव्हाण, सचिव अशोक पाटील, उपाध्यक्ष आनंदराव लोखंडे, खाजानिस शिवाजी पाटील, संचालक सुधाकर डोनोलीकर , आर.बी. पाटील,अशोक तोरसे, रवींद्र मोरे,सुरेश आरळेकर,अमोल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक शाहूवाडी पन्हाळा वासीय सेवा संघाचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केले. रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रमुख पाहुणे स्वाती गायकवाड म्हणाल्या,विद्यार्थ्यांनी यशाची उंच शिखरे गाठावीत. या स्पर्धेच्या युगात अभ्यासातील सातत्य व परिश्रम करणे खूप गरजेचे आहे. आपल्या यशाबरोबरच आपल्या कुटुंबाचाही नावलौकिक करणे गरजेचे आहे. पालकांनीही आपल्या इच्छा मुलांच्यावर न लादता त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन याप्रसंगी स्वाती गायकवाड यांनी केले. शाहूवाडी पन्हाळा सेवा संघाचे उपक्रम हे समाजाला नेहमीच प्रेरणादायी ठरत आले आहेत असे विचार शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी मांडले. याप्रसंगी शाहूवाडी पन्हाळा रत्न पुरस्कार प्राप्त विलास पाटील, सेवानिवृत्त नौसेना अधिकारी एन.डी.चाळके यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले. आभार अशोक तोरसे यांनी मानले. कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी ,त्यांचे पालक- शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.