कोल्हापुरात नदीच्या किनाऱ्यावर आढळल्या ४ मानवी कवट्या, बाकी सांगाडा गायब; नेमका प्रकार काय?
कागल प्रतिनिधी:- सुभाष भोसले
कोल्हापूर : कोल्हापूरकरांना हादरवणारी एक घटना आज समोर आली आहे. इथे कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली पैकी नदीकिनारा इथे आज सकाळी पोहायला गेलेल्या नागरिकांना नदीचे पाणी कमी झाल्याने नदीपात्रात चार आढळून आल्या. याबाबत नागरिकांनी तात्काळ पोलीस पाटील उद्धव पोतदार यांना याबाबतची माहिती दिली. पोलीस पाटील पोद्दार यांनी तात्काळ कागल पोलिसांना घटनेची माहिती दिली कागल पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या ठिकाणी पाहणी करून नदीपात्रातील मानवी कवट्या ताब्यात घेतल्या.
चार कवट्या आढळल्याने खळबळ
दुधगंगा नदीपत्रात पावसाने ओढ दिल्याने पाणी कमी झाले आहे. यामुळे सकाळी पोहायला गेलेल्यांना या कवट्या आढळून आल्या. एकाच ठिकाणी ४ मानवी कवट्या सापडल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुधगंगा नदी पत्रात कवट्या पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
अघोरी कृत्याचा संशय
काही दिवसांपूर्वीच सिद्धनेर्ली, बामणी या गावांमध्ये परप्रांतीय भोंदू बाबा आढळून आले होते. आता एकाच ठिकाणी चार कवट्या आढळून आल्याने हा अघोरी कृत्याचा तरी प्रकार नाही ना याबाबत चर्चा सुरू आहे. मानवी कवट्या नदीत आढळल्या आहेत. मात्र, उर्वरित देह कुठे टाकला याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. गेल्याच महिन्यात सांगली जिल्ह्यातील तरुणाचा वडिलांनीच खून करून शेजारच्या बामणी गावाच्या हद्दीमध्ये मृतदेह टाकला होता. यामुळे सिद्धनेर्ली आणि बामणी गावच्या नागरिकांच्यामध्ये घाबराटीचे वातावरण पसरलेआहे.