कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. रामगौडा पाटील याना पी.एच. डी. प्रदान

कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. रामगौडा पाटील याना पी.एच. डी. प्रदान

वारणानगर (प्रतिनिधी) : येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्युट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभाग प्रमुख प्रा. रामगौडा पाटील याना के.एल. विद्यापीठ येथून पी.एच. डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी संगणक अभियांत्रिकीमधील "डेव्हलपमेंट ऑफ हायब्रीड इवोल्युशनरी अल्गोरिथम फॉर इम्प्रूविंग परफॉर्मन्स ऑफ कॉन्संट्रेन्ट बेस्ड इंटरॅक्शन टेस्टिंग" या विषया वर डॉ. व्ही. चंद्रप्रकाश यांचे मार्गदर्शनाखाली संशोधन केले. 

 प्रा. रामगौडा पाटील यांना आमदार डॉ .विनयरावजी कोरे , अध्यक्ष, वारणा विविध शिक्षण व उद्योग समूह ,डॉ. व्ही.व्ही.कारजिन्नी, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री वारणा शिक्षण मंडळ, डॉ. डी. एन. माने, प्र. प्राचार्य, डीन डॉ. एस.एम.पिसे, संगणक विभागांतील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.