धक्कादायक प्रकार..!कोल्हापुरातील कौलवमध्ये नरबळीचा प्रयत्न?

धक्कादायक प्रकार..!कोल्हापुरातील कौलवमध्ये नरबळीचा प्रयत्न?

राधानगरी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कौलव गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शरद माने यांच्या घरामध्ये खड्डा करून धार्मिक विधी सुरू करण्यात आले होते. या विधीमुळे नरबळीचा प्रयत्न झाला का? अशी चर्चा आहे.कौलवचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. राधानगरी पोलिसात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळ आणि आणखी 6 जणांवर नरबळी आणि जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळीचा प्रयत्न सुरू होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.