पराभवानंतर जयंत पाटलांचा मोठा दावा!
मुंबई (प्रतिनिधी) : जयंत पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीत १२ मतं मिळाल्याचं स्पष्ट झालं होतं, आणि ही १२ मतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या १२ आमदारांची असल्याचं मानलं जात होतं. पण आता जयंत पाटील यांनीच पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्टीकरण दिलं आहे की त्यांना शरद पवार गटाची सर्व बारा मतं मिळाली नाहीत.पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी सांगितलं की, "माझ्या मतांमध्ये शरद पवार गटाच्या काही मतांचा समावेश आहे, पण सगळेच आमदारांनी मला मत दिलं असं नाही. काही मतं इतरही ठिकाणांहून मिळाली आहेत."यामुळे महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय सुरू आहे, याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
काँग्रेसनं जर दुसऱ्या पसंतीची मतं समान वाटली असती किंवा जर पहिल्या पसंतीची काही मतं दिली असती तर निकाल बरोबर लागला असता. मी १४ मतं घेऊनच निवडणूक लढलो होतो. पण हे नाटक बदललं आहे. मी यावर बोलेन. पण मलाही याचा अभ्यास करावा लागेल. या निवडणुकीत मतदारांवर इतर गोष्टींचा एवढा प्रभाव होता की ते काहीच करू शकले नाहीत. पहिली पसंती, दुसरी पसंती याचा मी अभ्यास केलेला नाही. राष्ट्रवादीचं एक मत फुटलं. आमचं एक मत मला मिळालं”, असं जयंत पाटील म्हणाले.
आघाडीतील एकोपा आणि शरद पवार गटातील मतभेद यावर अधिक चर्चा होत आहे. त्यामुळे आगामी काळात आघाडीच्या राजकीय समीकरणांमध्ये कोणते बदल होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.