लाईन बाजार हॉकी मैदानासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ सादर करा : श्री.राजेश क्षीरसागर

लाईन बाजार हॉकी मैदानासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ सादर करा : श्री.राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षात हॉकीसाठी उपलब्ध असणारे लाईन बझार येथील मैदानाची दुरावस्था झाल्याने खेळाडूंच्या सरावावर मर्यादा येत होत्या. त्यामुळे तात्काळ या मैदानाचे नूतनीकरण करून आवश्यक सोयी सुविधा खेळाडूंना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पहिल्या टप्प्यात या मैदानाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलभूत सोयी सुविधा निधीतून रु.१ कोटी ७५ लाखांचा निधी दिला आहे. याच्या पुढील टप्प्यात या मैदानात टर्फ विथ शॉक पॅड बसविण्यासाठी रु.३ कोटी ७५ लाखांचा निधी आवश्यक असून, याचा आराखडा तयार करून प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. तात्काळ राज्य शासनाकडून यास मंजुरी घेवून निधी उपलब्ध करून देवू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली.

कसबा बावडा येथील लाईन बझार हॉकी मैदानाची आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी रु.१ कोटी ७५ लाखांच्या निधीतून झालेल्या कामाची माहिती श्री.क्षीरसागर यांनी घेतली. यासह नव्याने कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यासह आवश्यक निधीचा प्रस्ताव आजच्या आज शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या. 

यावेळी मनपा शहरअभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश कांबळे, शिवसेना समन्वयक सुनील जाधव, रोहन उलपे, कृष्णा लोंढे, सचिन पाटील, आदर्श जाधव, आकाश चौगले, अमित कांबळे, जय लाड आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.