कोरे अभियांत्रिकीच्या प्रा.प्रिती शिरगावकर यांना पेटंट
कोल्हापूर (प्रतिनिधी) : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागाच्या प्रा. प्रिती शिरगावकर यांना स्मार्ट पोर्टेबल अटेंडंन्स मशिन या विषयावरील संशोधनाला केंद्र सरकारकडून डिजाईन पेटेंट प्रमाणित करण्यात आले.
यावेळी प्रा.प्रिती शिरगावकर यांचा सत्कार श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.व्ही.व्ही. कारजिन्नी यांच्या हस्ते करण्यात आला व वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ.विनयरावजी कोरे यांचे मार्गदर्शन लाभले.प्रा. शिरगावकर यांच्या सत्कारप्रसंगी अधिष्ठाता डॉ.एस.एम.पिसे प्राचार्य डॉ.डी,एन माने ,संगणक विभागप्रमुख डॉ.आर.बी.पाटील, संगणक विभागाचे शैक्षणिक समन्वयक डी.बी.मिरजकर रजिस्टार संजीवकुमार खंडाळ यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते .