कोरे अभियांत्रिकीतील ६०८ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी

कोरे अभियांत्रिकीतील ६०८ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी

कोल्हापूर (प्रतिनिधि) : तात्यासाहेब कोरे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ (जून २०२५ पर्यंत) ६०८ विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये कँम्पस इंटरव्ह्यू नोकरीच्या संधी मिळाल्या. निलेश जाधव या विद्यार्थ्यांना एक्सपर्टीज कन्सल्टन्सी प्रा. लि. सौदी अरेबिया येथे १०.१ लाखाचे आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट मिळाले. महाविद्यालयाला १७५ हून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भेट दिली अशी माहिती श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी दिली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व आपल्या ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी करावा असा मौलिक सल्ला केला.मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, प्र.प्राचार्य डॉ. डी. एन. माने, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. पी. जे पाटील व सहयोगी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आर. सी. शिक्केरी, सर्व विभागप्रमुख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व विभागाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समन्वयकांचे व सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ वर्षात निवड झालेल्या विद्यार्थ्याची अभियांत्रिकी विभागवार संख्या अशी : मेकॅनिकल इंजिनिअरिंग: -१५१ ऑफर्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग -१७९ ऑफर्स, सिव्हील-१०८ ऑफर्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन - ८४ ऑफर्स आणि केमिकल- ८६ ऑफर्स, भेट दिलेल्या १५० कंपन्यामध्ये 

टीसीएस,गॅलक्सी सरफेक्टनंट्स, रिलायन्स, वायनम, टेक्नीमाँण्ट मुंबई, टोयो, फाईन केमिकल्स, वर्ली, स्मार्ट स्पेस अहमदाबाद, वालचंद नगर इंडस्ट्रीज, करमतरा इंजिनिअरिंग, या आणि अशा अनेक नामंकित कंपन्यानी भेट दिली.या निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ४ लाखापासून ते १०. २ लाखापर्यंत पॅकेज मिळाली. 

ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलमार्फत या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डिग्रीच्या दुसऱ्या वर्षापासून कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह कार्यरत राहतो, त्यामध्ये ते दुसऱ्या वर्षासाठी ५० तास तिसऱ्या वर्षासाठी १०० तास व अंतिम वर्षासाठी ३० तासांचे ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिले जाते. या १८० तासांच्या ट्रेनिंग मध्ये एप्टीट्यूड टेस्ट, लॉजिकल रिझनिंग टेक्निकल ट्रेनिंग, इंटरव्यू एटिकेट्स, बायो-डटा ई-मेल पाठवणे, मुलाखती. इत्यादी अशा अनेक बाबी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात.