कोल्हापुरात शनिवारपासून आरपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

कोल्हापुरात शनिवारपासून आरपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

कोल्हापूर - रोटरी क्लब कोल्हापूर सेंट्रल यांच्या वतीने आयोजित केलेल्या रोटरी प्रीमियर लीग - आरपीएल २०२५ या क्रिकेट स्पर्धेला शनिवार १९ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. मेरी वेदर मैदानावर दिवस रात्र होणाऱ्या स्पर्धेतील सहा संघातून कोल्हापूर, सांगली, बेळगाव, हुबळी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग  येथील ७८ खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत.

आर पी ग्रुप हेरंब शेळके हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून हॉटेल द क्यूबिक हे हॉस्पिटॅलिटी  पार्टनर आहेत, अशी माहिती क्लबचे प्रेसिडेंट संजय भगत आणि  इव्हेंट चेअरमन रवी मायदेव यांनी दिली. रोटरी मधील खेळाडूंमध्ये संघ भावना वाढीस लागावी आणि मैत्रीची संबंध वाढावेत या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेमध्ये सहा संघ सहभागी होत आहेत. 

यामध्ये उद्योजक संग्राम पाटील यांचा एमडब्ल्यूजी सुपर किंग्स, उद्योजक तेज घाटगे आणि डॉ. संजय देसाई यांचा माई हुंडाई सिद्धिविनायक, उद्योजक संजय भगत आणि टी. आर. पाटील कोहिनूर कीर्ती चॅलेंजर्स , व्यंकटेश बडे यांचा बडेज लकी लेजंडस, संजय कदम आणि सचिन परांजपे यांचा लाईफ लॉंग मोती महल, निलेश पाटील यांचा हॉटेल किनारा स्पोर्ट्स या संघाचा समावेश आहे . विजेते आणि उपविजेत्या संघाबरोबरच  प्रत्येक सामन्यातील सामनावीर ,मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज तसेच प्रत्येक सामन्यात जास्तीत जास्त षटकार मारणारा खेळाडू अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहे. 

या स्पर्धेसाठी क्लब सेक्रेटरी रवी खोत,  इव्हेंट को - चेअरमन डॉ. महादेव नरके, रविराज शिंदे, सचिन गाडगीळ, फ्रेंचाईजी कमिटी प्रमुख संग्राम शेवरे, अभिजीत  भोसले ,दाजीबा पाटील, निलेश पाटील  यांच्यासह रोटेरियन कार्यरत आहेत.