रियान परागचा षटकारांचा पाऊस; तरीही युवराजचा विक्रम अबाधित

कोलकाता, IPL 2025: रविवारी झालेल्या आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या रियान परागने षटकारांची आतषबाजी केली आणि क्रिकेटप्रेमींना युवराज सिंगची आठवण करून दिली. केकेआरविरुद्धच्या सामन्यात परागने सलग 6 षटकार ठोकले, पण तरीही युवराजच्या ऐतिहासिक विक्रमाची बराबरी करू शकला नाही.
वास्तविक, परागने एका षटकात सलग 6 षटकार मारले नाहीत. मोईन अलीच्या 13 व्या षटकात तो स्ट्राईकवर दुसऱ्या चेंडूला आला आणि पुढे 5 षटकार मारले. त्यानंतर 14 व्या षटकात आणखी एक षटकार मारला. त्यामुळे त्याची कामगिरी सलग षटकारांमध्ये आली असली, तरी एका षटकात नव्हती ज्यामुळे युवराज सिंगच्या 2007 मधील टी-20 विक्रमाची तो बरोबरी करू शकला नाही.
परागचे शतक हुकले
परागने 45 चेंडूत 95 धावा ठोकल्या, ज्यात 6 चौकार आणि 8 षटकार होते. मात्र, हर्षित राणाच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला आणि राजस्थानला एक धावेने पराभवाचा सामना करावा लागला.