हणमंतवाडीच्या कुस्ती मैदानात पै. सुरज मुंढेंनी मारली बाजी..!

कोल्हापूर - राजर्षी शाहू कुस्ती केंद्राचे पैलवान सुरज मुंढे विरुद्ध गंगावेश तालमीचे पैलवान सतपाल नाग तिलक यांच्यात झालेल्या रंजक कुस्ती सामन्यात सुरज मुंढे यांने अवघ्या दहाव्या मिनिटाला घुटना डावावर नागतिलकला पराभूत करून प्रथम क्रमांक पटकाविला. या कुस्तीला सरपंच तानाजी नरके यांनी वडील धोंडीराम नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. यावेळी दिडशेभर कुस्त्या आयोजकाकडून खेळवण्यात आल्या.
द्वितीय क्रमांकाची कुस्ती तेजस मोरे शिंगणापूर विरूद्ध संकेत पाटील यांच्यात झाली. या लढतीत तेजस मोरे विजयी झाले. तर, तृतीय क्रमांकाची कुस्ती यश माने वाकरे विजयी झाले. महिलांच्या कुस्तीत प्रथम क्रमांक अंकिता जाधव, पल्लवी जाधव, श्रावणी लव्हटे आदी महिला विजयी झाल्या. कुस्ती कमिटीच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. माजी सरपंच संजय जाधव यांच्या हस्ते सहा कुस्त्यांची बक्षिसे देण्यात आली. कुस्ती कमिटीचे अध्यक्ष संभाजी पिंजरे यात्रा कमिटी आणि मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
यावेळी पंचायत समिती माजी सदस्य इंद्रजित पाटील, गोकुळ संचालक एस आर पाटील, पोलीस पाटील रविंद्र जाधव,संदीप भापकर, विष्णू जाधव, चेअरमन शिवाजी पाटील, लक्ष्मण जाधव, सदाशिव झांजगे,अमर पिंजरे, बजरंग शिनगारे,खानू धनगर, यात्रा कुस्ती कमिटी अध्यक्ष संभाजी पिंजरे, माजी सरपंच संग्राम भापकर,महादेव शिंदे, संजय नणुंद्रे, जालिंदर मुंढे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.