विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून एक लाखाचा निधी..!

विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून एक लाखाचा निधी..!

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानाची दुरुस्ती व नूतनीकरण यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या कोल्हापूर शाखेकडून एक लाख रुपयांचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) देण्यात आला आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या कोल्हापूर सर्कलचे प्रमुख रंजन सिंग यांनी सामाजिक दायित्व निधीअंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानाची दुरुस्ती व नूतनीकरण यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला. त्याचप्रमाणे येथून पुढेही आवश्यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध करून देण्याचेही सूतोवाच त्यांनी केले. विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य ॲड. अजित पाटील यांनी या संदर्भातील ठराव मांडला होता. त्यांनी हा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले.

या धनादेश प्रदान प्रसंगी अधिसभा सदस्य ॲड. अभिषेक मिठारी, पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी जतीन परमार, ॲड. अंकिता मिठारी, राहुल पाटील उपस्थित होते.