HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोल्हापूर : महेंद्र पंडीत नवे जिल्हा पोलिस प्रमुख, शैलेश बलकवडे यांची पुणे येथे बदली

कोल्हापूर : महेंद्र पंडीत नवे जिल्हा पोलिस प्रमुख, शैलेश बलकवडे यांची पुणे येथे बदली

कोल्हापूर प्रतिनिधी मुबारक आत्तार 

कोल्हापूरचे विद्यमान जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांची पुणे येथे राज्य राखीव पोलिस दल बल गट क्रमांक एकचे समादेशक म्हणून नियुक्ती 

कोल्हापूरचे जिल्हा पोलिस प्रमुख डाॅ. शैलेश बलकवडे गेल्या अडीच वर्षापासून कार्यरत होते या कालावधीत त्यांनी पोलीस दलात मोठे बदल केले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे मोठे फेरबदल केले होते. तसेच आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात देखील यश मिळवले, गुंडांवर तडीपारची कारवाई करत गुन्हेगारी मोडीत काढली होती. नुकतेच त्यांनी ऊस वाहतूकदारांना फसवलेल्या जिल्ह्यातील मुकादमाच्या कडे मोठी कारवाई करण्याचे संकेत दिले होते.

अशा तऱ्हेने त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी भरीव कार्य करत असताना पुणे येथे राज्य पोलिस दलाचे समादेशक म्हणून नियुक्ती झाली आहे.

तर त्यांच्या जागी 2013 मध्ये आयपीएस झालेले महेंद्र कमलाकर पंडित यांची कोल्हापूरचे नवे जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी (दि. २४) सांयकाळी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आला. 

पंडीत मुंबई येथे आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपआयुक्त म्हणून कार्यरत होते. भारतीय पोलिस सेवेचे २०१३ च्या बॅचचे अधिकारी असलेले पंडीत यांनी सहाय्यक पोलिस अधिक्षक म्हणून गडचिरोली येथे तर पोलिस अधिक्षक म्हणून नंदूरबार मुख्य जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल 2011 मध्ये पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले असून आता महेंद्र पंडीत हे जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून कोल्हापूरला लाभले आहेत.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.