क्रिडाई कोल्हापूरच्या नवीन मॅनेजिंग कमिटीचा पदग्रहण सोहळा संपन्न

क्रिडाई कोल्हापूरच्या नवीन मॅनेजिंग कमिटीचा पदग्रहण सोहळा संपन्न

कोल्हापूर : गेली ३७ वर्षे कार्यरत असलेल्या क्रिडाई कोल्हापूर या बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या सन २०२५-२७ सालाकरीता नविन मॅनेजिंग कमिटीची बिनविरोध निवड झाली असून, सध्याचे अध्यक्ष के .पी.खोत यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.या मॅनेजिंग कमिटीचा पदग्रहण समारंभ कोल्हापूर चे जिल्हाधिकारी मा.अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार होता परंतु पालकमंत्री यांच्या बरोबर मिटींग असल्याने त्यांना या कार्यक्रमाला हजर राहाता आले नाही. त्यामुळे हा कार्यक्रम कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी, कोल्हापूर चे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडीत, क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष  के.पी.खोत , क्रिडाई महाराष्ट्राचे सचिव विद्यानंद बेडेकर यांच्या उपस्थितीत हाॅटेल सयाजी येथे दि. २८ मार्च  रोजी पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रगीत व दिप प्रज्वलनाने झाली.यावेळी मान्यवरांचा क्रिडाई कोल्हापूर च्या वतीने सत्कार करण्यात आला. संघटनेचे सहसचिव नंदकिशोर पाटील यांनी संघटनेची माहिती सादर केली.

यानंतर क्रिडाई कोल्हापूर चे सचिव संदीप मिरजकर यांनी २०२३-२०२५ या कालावधीचा अहवाल सादर केला. तसेच क्रिडाई कोल्हापूर वुमेन्स विंग च्या को ऑडीऺनेटर संगीता माणगांवकर यांनी आपल्या कालावधीतील कामाचा अहवाल सादर केला.क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत यांनी आपल्या दोन वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत केलेल्या कामाचा आढावा सादर केला. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते अध्यक्ष के.पी.खोत यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.क्रिडाई महाराष्ट्राचे सचिव विद्यानंद बेडेकर यांची क्रिडाई महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल महेंद्र पंडीत साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

के. मंजूलक्ष्मी यांनी के .पी.खोत यांची सन २०२५-२७ सालाकरीता क्रिडाई कोल्हापूर च्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याची व पदभार स्वीकारण्याची घोषणा करून त्यांना अध्यक्षपदाचे मेडल व पिन प्रदान केले व २०२५-२०२७ साला करीता अध्यक्ष पदाची सुत्रे सुपूर्त केली.

संघटनेचे सन २०२३-२५ चे अध्यक्ष श्री.के.पी.खोत यांनी गेल्या दोन वर्षांच्या काळात केलेल्या कामाची पोच पावती व धडाडीने केलेले काम म्हणून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी माझी निवड झाली याबद्दल कोल्हापूरच्या सर्व जेष्ठ सभासद, सर्व सभासद व मॅनेजिंग कमिटी चे आभार मानले.पुढील दोन वर्षांमध्ये संकल्पना राबविताना क्रिडाई कोल्हापूर कार्यालयाची निर्मिती करणे, त्याचबरोबर सभासदांच्यासाठी ऍपची निर्मिती करणे व जानेवारी २०२६ मध्ये बांधकाम विषयक प्रदर्शन दालनं धुमधडाक्यात घेणे याचबरोबर क्रिडाईची नेहमीची जी कामे आहेत ती सुद्धा चांगल्या पद्धतीने नवनवीन सेमिनार च्या माध्यमातून करणार असल्याचे जाहीर केले.

क्रिडाई कोल्हापूर युथ विंग ला खास करुन एक सल्ला दिला की, युथ विंग ची कमीटी करा ,मिटींग घ्या, दोन वर्षाचे कामाचे कॅलेंडर करा, त्या कॅलेंडर नुसार कोणते सेमिनार पाहिजे ते घेण्याचा प्रयत्न करा यासाठी आवश्यक असणारे सर्व सपोर्ट मी व माझे कार्यकारी मंडळ देईल. त्यातून आपणास कायद्याची, सगळ्या गोष्टींची माहिती घ्यावी यातूनच पुढचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणी तयार होणार व तसेच चांगले बिल्डर निर्माण होणार आहेत त्यासाठी सक्रीय राहाण्याचा सल्ला दिला. पुढील दोन वर्षांच्या काळात क्रिडाई कोल्हापूर च्या सभासदांना बांधकाम क्षेत्राशी निगडीत येणाऱ्या अडचणी सोडविणे, कोल्हापूर शहराची हद्दवाढ, सर्किट बेंच, कोल्हापूर शहराचा डीपी प्लॅन, कोल्हापूर शहरातील रस्ते विकास करणे, वाहतूकीचा प्रश्न असे जिव्हाळ्याचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

सन २०२५-२७ च्या मॅनेजिंग कमिटी मध्ये निवड झालेल्या सदस्यांची घोषणा खालील प्रमाणे अध्यक्ष के.पी.खोत यांनी केली व पाहुण्यांच्या हस्ते त्यांना पिन प्रदान करण्यात आली.

उपाध्यक्ष,प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव -गणेश सावंत, खजानीस अजय डोईजड, सहसचिव निखिल शहा, सहसचिव नंदकिशोर पाटील, सहखजानीस श्रीराम पाटील, सहखजानीस सागर नालंग अशी निवड करण्यात आली.

मॅनेजिग सदस्य :

सचिन ओसवाल, गौतम परमार, प्रदीप भारमल, आदित्य बेडेकर, चेतन चव्हाण, संदिप पवार, अमोल देशपांडे, श्रीकांत पाटील, संग्राम दळवी, अतुल पोवार, सुनील चिले, मौक्तिक पाटील.क्रीडाई कोल्हापूरच्या युथ विंग को ऑडिनेटर पदी  प्रणव क्षीरसागर, को -कोऑडिनेटर पदी प्रतीक होसमणी, तसेच क्रीडाई कोल्हापूरच्या वूमेन को - ऑडिनेटरनेटर पदी  मोनिका बकरे, को - को ऑडिनेटर नेटर पदी शिल्पा कुलकर्णी, यांची निवड केल्याची घोषणा अध्यक्ष के. पी. खोत यांनी केली.

क्रिडाई कोल्हापूरने सभासदांच्या साठी तयार केलेल्या नवीन अँप बदल हर्षवर्धन साळोखे, सिईओ, Veloce Tech Insights यांनी माहिती दिली त्यानंतर क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के . पी. खोत व हर्षवर्धन साळूंखे MOE वरती सहया केल्या .या अँप विषयी बोलताना क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष  के. पी. खोत यांनी सभासदांसाठी अँप ची निर्मिती करण्याचा मानस यापूर्वीच व्यक्त केला होता. त्याची सुरवात आजच्या पदग्रहणाच्या दिवशी सभासदांना करून द्यायची त्यांची संकल्पना होती. ती आज रोजी प्रत्यक्षात अँप MOE वरती सही करून अँप निर्मितीची मुहूर्त रोवली. 

महेंद्र पंडित, जिल्हा पोलीस प्रमुख, कोल्हापूर, यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, जर काय कोल्हापूरच्या सभासदांवर अन्याय होणार असेल तर पोलीस चागल्या गोष्टीसाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. एखाद्या बिल्डरच्या साईट वरती एखादी घटना घडली तर त्याबाबतचा अवेरणेस आमच्या पोलिसांमध्ये तयार करून क्रिडाई कोल्हापूरने एक एस. ओ. पी. तयार करून सादर करावा म्हणजे मला माझ्या पोलिसांमध्ये त्याबाबत जागरूकता निर्माण करता येऊ शकते. म्हणजे ज्या बिल्डरच्या साईट वरती बांधकाम चालू असते त्या बिल्डरने हे काम वेगवेगळ्या एजन्सिला दिले असते. प्रत्यक्ष या मध्ये क्रिडाई बांधकाम व्यावसायिकाचा जर सहभाग नसेल तर तुमच्या करार पत्रामध्ये नमूद असेल तर त्याबाबतीत दक्षता घेउन सूचना माझ्या अधिकाऱ्यांना व पोलिसांना देईल अशा प्रकारची ग्वाही देऊन नवीन क्रिडाई कोल्हापूरच्या 2025-27 च्या कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या. त्या प्रमाणे माहिती अधिकाराची काही आवश्यकता नसताना वारंवार पैसे काढण्याच्या अनुषंगाने काही मानसिक त्रास बांधकाम व्यावसायिकना दिला जातो त्यासाठी मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका व पोलीस अधिक्षक यांची एक एकत्रित कमिटी स्थापन करण्याचे महेंद्र पंडित यांनी मान्य व कबूल केले. 

के. मंजुलक्ष्मी, प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, क्रिडाई कोल्हापूर नेहमीच सामाजिक उपक्रमात भाग घेत असते . क्रिडाई कोल्हापूर ने वेळोवेळी कोल्हापूर महानगरपालिकेला मार्गदर्शन केले आहे. नुकत्याच झालेल्या इस्त्रो दौऱ्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना महानगरपालिकेने पाठवले होते त्यांना सुद्धा कोट, सुट, बुट देण्याचे काम क्रिडाई कोल्हापूर ने केले आहे. माझ्या कडून क्रिडाई कोल्हापूर च्या काही कामांची पूर्तता झाली असून काही कामांची पूर्तता अद्यापही बाकी आहे. ती पुढील काळात करेन अशी ग्वाही दिली. कोल्हापूर महानगरपालिका व क्रिडाई कोल्हापूर चे चांगले नेटवर्क निर्माण झाले आहे असे नमूद करून क्रिडाई कोल्हापूर च्या नुतन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. 

या पदग्रहण कार्यक्रमास कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर , उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजानीस अजय डोईजड व नुतन कार्यकारिणीतील सदस्य, २०२३-२५ चे उपाध्यक्ष गौतम परमार, सचिव संदिप मिरजकर व पदाधिकारी,क्रिडाई महाराष्ट्राचे सचिव विद्यानंद बेडेकर, क्रिडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजीव परीख, क्रिडाई कोल्हापूर चे माजी अध्यक्ष गिरीश रायबागे, माजी अध्यक्ष महेश यादव, जेष्ठ सभासद कृष्णा पाटील पाटील, प्रकाश मेडशिंगे, श्रीनिवास गायकवाड, अभिजित मगदूम, धोंडीराम रेडेकर, सुजय होसमनी, विलास रेडेकर, शंकर गावडे, सर्व सभासद, कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी, क्रिडाई युथ विंग सदस्य, क्रिडाई वुमेन्स विंग चे सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी संघटनेचे सचिव गणेश सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.