कर्मचारी समन्वय समिती बेमुदत संप पाचव्या दिवशी काय कर्मचारी यांचा संप बेरोजगारी व नोकरभरती च्या मुद्द्यावर होणार जनआंदोलनात रूपांतर
माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांची सपांच्या मंडपाला भेट
संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी 2005 नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचारी यांना 1982 ची जुनी कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी यासाठी राज्यातील सर्व कर्मचारी संघटना यांच्या समन्वय समिती च्या माध्यमातून दि 15 मार्च पासून बेमुदत संप पुकारला आहे.आज दिनांक 18 मार्च 2023 ला संपाच्या 5 व्या दिवशी सुद्धा संपकरी आपल्या संपावर ठाम आहे.
एकीकडे जुन्या पेंशन साठी संप सुरू असताना शासनाने दुसरीकडे शासकीय कर्मचारी भरती साठी 15 खाजगी कंपनी यांची नियुक्ती करून आपल्या महाराष्ट्र राज्याची वाटचाल ही खाजगीकरण व भांडवलीकरण याकडे होताना दिसत असून भविष्यात जे लाखो विद्यार्थी आज शासकीय नोकरीच्या स्पर्धा परिक्षा चा अभ्यास करत आहे त्यांच्या अपेक्षा वर या शासनाने स्वप्ने धुळीस मिळविले आहे.
एकीकडे पेंशन साठी आंदोलन होत असतानाच महागाई व बेरोजगारी यावर मुद्द्यावर आता हे आंदोलन जनआंदोलन यामध्ये रूपांतरित होणार आहे हे चित्र दिसत आहे.
या संपाला राजपत्रित अधिकारी संघटना यांच्या कडून राळेगाव येथील आंदोलन स्थळी राळेगाव पंचायत ससमितीचे गट विकास अधिकारी केशव पवार साहेब आणि नगर पंचायत हे मुख्याधिकारी अनुपकुमार अग्रवाल यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर करून दि 28 मार्च पासुन आम्ही सुद्धा सक्रियपणे सहभागी होत असल्याबाबत अभिवचन दिले.तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री श्री वसंतराव पुरके सर यांनी संपाच्या मंडपाला भेट देऊन पाठिंबा जाहीर करण्यात आला ,हळूहळू संप हा व्यापक रूप धारण करून जनआंदोलन रुपांतर होऊन सर्वसामान्य जनतेच्या सहभागाने व्यापक रूप धारण करणार आहे. त्यामुळे शासनाने कर्मचारी व जनतेस वेठीस न धरता तात्काळ या आंदोलनात तोडगा काढावा अशी सर्वसामान्य जनतेमधून मागणी होत आहे