गांधीनगर वसाहत रुग्णालयात कंत्राटी पद भरतीसाठी 11 जुलै पर्यंत अर्ज करावेत

गांधीनगर वसाहत रुग्णालयात कंत्राटी पद भरतीसाठी 11 जुलै पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापुरातील गांधीनगर वसाहत रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत निव्वळ कंत्राटी तत्वावर 11 महिने कालावधी करीता रिक्त पदांच्या भरती करीता अर्ज करावेत. 

पदांच्या अनुषंगाने अटी व शर्ती वसाहत रुग्णालयातील नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आल्या असून पात्र उमेदवारांनी या कार्यालयाकडील जाहिरातीनुसार आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज समक्ष वैद्यकीय अधिक्षक वसाहत रुग्णालय, गांधीनगर या कार्यालयात  3 ते 11 जुलै अखेर कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन गांधीनगर वसाहत रुग्णालयाचे सदस्य सचिव तथा वैदद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांनी केले आहे.