भारतीय जनता पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा

भारतीय जनता पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान देशाला अर्पित केले.

आज २६ नोव्हेंबर २०२४ रोजी या ऐतिहासिक घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्या बद्दल संविधान अमृत महोत्सव वर्ष निमित्त भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर वतीने पक्ष कार्यालयात मोठ्य उत्साहात संविधान अमृत महोत्सव दिन साजरा करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

भाजपा अनुजा मोर्चा अध्यक्ष अनिल कामत यांनी संविधान दिनाची माहिती उपस्थितांना दिली.

याप्रसंगी हेमंत आरध्ये, अप्पा लाड, विजय आगरवाल, अवधूत भाट्ये, रणजित औधकर, प्रविण शिंदे, राज पोळ, माणिक पाटील चुयेकर, मोनाली आवळे, स्वाती कदम, सोनम काबळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.