नवरात्रोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

नवरात्रोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवरात्रीत करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन  विधिवत पूजा केली. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, महादेव दिंडे उपस्थित होते.