गांधीनगर वसाहत रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा शिवसेना उबाठा गटाच्या वतीने सत्कार - विक्रम चौगुले बापू

गांधीनगर वसाहत रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा शिवसेना उबाठा गटाच्या वतीने सत्कार - विक्रम चौगुले बापू

 कोल्हापूर (प्रतिनिधी) - गांधीनगर वसाहत रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा शिवसेना उबाठा गटाच्या वतीने सत्कार शनिवारी दुपारी बारा वाजता करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख समन्वयक विक्रम चौगुले बापू यांनी दिली. 

गांधीनगर शासकीय उपजिल्हा वसाहत रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या उत्तम सेवेबाबत व या सेवेच्या माध्यमातून राज्य शासनाकडून मिळालेल्या अनेक विविध पुरस्कारांबद्दल वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर दिलीप वाडकर व त्यांचे सहकारी डॉक्टर तसेच परिचारिका वर्ग औषध विभागातील कर्मचारी रुग्णालयातील अन्य कर्मचारी व कार्यानहीन कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात येणार आहे. 

उत्तेजनार्थ सलग सात वर्ष राज्य शासनाचा पुरस्कार मिळवण्याचा मान या रुग्णालयाने डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट सेवेतून मिळवला गांधीनगर वसगडे चिंचवड गडमुडशिंगी उंचगाव न्यू वाडदे वसाहत सह परिसरातील रुग्णांकडून कौतुकास पात्र ठरलेले व उत्तम सेवा देणारे हे रुग्णालय राज्यातील आरोग्य विभागांना व रुग्णालयांना आदर्श ठरेल असही शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख समन्वयक विक्रम चौगुले बापू यांनी सांगितले.