गोकुळ दूध संघाच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

गोकुळ दूध संघाच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी म्हैस व दूध "गोकुळ श्री" विजेते यांचा सत्कार केला. गोकुळचे गुणवंत कामगार व विक्रेते डिलर यांचा शाल, श्रीफळ, शिल्ड व चाफ्याचे झाड देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी युनिव्हर्सिटीचे माजी सिनेट सदस्य मा.श्री.मधुकर पाटील यांनी "गोकुळ समृद्धीकडे" या विषयावर व्याख्यान दिले. गोकुळ कर्मचारी स्टाफ यांच्या करीता नवीन ॲंब्युलन्स गाडी देण्यात आली.

हिरक महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या

वेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील (आबाजी), ज्येष्ठ संचालक अरुणराव डोंगळे, नविदसो मुश्रीफ, अजित नरके, डॉ.सुजित मणचेकर, बाबासाहेब चौगुले, श्रीमती अंजना रेडकर, अमर पाटील, सर्व अधिकारी, शाखाप्रमुख, दूध उत्पादक संस्था, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.