टिप्परचालकांच्या किमान वेतनासाठी महापालिकेसमोर 'आप'चा घंटानाद
प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर,शहरातील कचरा उठावाचे काम करणाऱ्या टिप्पर वाहनांवरील चालक महापालिकेकडे कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. टिप्परचालकांना किमान वेतन मिळावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. घंटेच्या ठोक्याने महापालिका परिसर दुमदुमला होता. या आंदोलनामध्ये शंभराहून अधिक टिप्परचालकांनी सहभाग घेतला.
टिप्परचालक 8100 इतक्या तुटपुंज्या वेतनावर गेली 4 वर्षे ते काम करत आहेत. कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिले जाते का नाही हे तपासूनच महापालिकेने ठेकेदारांची बिले काढण्याचे अपेक्षित असताना मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जुने टेंडर बदलून, नवीन टेंडरमध्ये किमान वेतनाच्या अटी समाविष्ट कराव्यात, किमान वेतन दिले जाते का नाही हे तपासूनच ठेकेदारांची बिले काढावीत या मागण्या यावेळी करण्यात आल्या. हा आंदोलनाचा पहिला दिवस असून, उद्या महापालिकेसमोर ठिय्या मांडला जाणार असल्याचे 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.
रविवारपर्यंत यावर निर्णय न झाल्यास सोमवार पासून संपावर जाण्याचा इशारा टिप्परचालकांनी दिला आहे.
यावेळी सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, उत्तम पाटील, संजय साळोखे, दुष्यंत माने, विजय हेगडे, अमरजा पाटील, पूजा आडदांडे, डॉ. उषा पाटील, उषा वडर, संजय राऊत, कुमार साठे, युवराज कवाळे, रणजित बुचडे, करण चौधरी, जयसिंग चौगुले, अमरसिंह दळवी, आदी उपस्थित होते.