जागतिक टपाल दिनानिमित्त टपाल कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त

जागतिक टपाल दिनानिमित्त टपाल कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून साने गुरुजी वसाहत येथील टपाल कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांना पुस्तके आणि पुष्प देवून पवार ट्रस्ट तर्फे सन्मानित  करून , शुभेच्छा देण्यात आल्या. राजोपाध्येनगर येथील कै. हौसाबाई पवार ट्रस्ट, राजर्षी शाहू अध्यासनातर्फे संस्थापक माजी प्राचार्य डॉ.जे.के पवार यांनी आज जागतिक टपाल दिनानिमित्त टपाल कार्यालयात जाऊन सर्वच सेवकांचा सन्मान केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. टपाल कर्मचार्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी डॉ.पवारांनी 'पत्रं पावलेली अन् भावलेली,' 'शिक्षण क्षेत्रातील नवदुर्गा,' 'राजर्षी शाहूंचे विचारधन' ही पुस्तके आणि पुष्प देऊन सर्वच कर्मचाऱ्यांना  अभिनंदन केले.