HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

जागतिक दुग्ध दिनानिमित्त सीपीआर रुग्णालयात गोकुळतर्फे दूध व फळांचे वाटप

जागतिक दुग्ध दिनानिमित्त सीपीआर रुग्णालयात गोकुळतर्फे दूध व फळांचे वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी) - १ जून जागतिक दुग्ध दिनानिमित्त गोकुळ मार्फत छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर (सीपीआर) रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक व कर्मचारी यांना मोफत पोषणयुक्त आहार स्वरूपात गोकुळ सुगंधी दूध व फळे वाटप गोकुळचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक संभाजी पाटील यांच्या हस्ते तसेच कार्यकारी संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर (सीपीआर) येथे करण्यात आले.

गोकुळच्या वतीने दरवर्षी दुधाच्या पोषण मूल्याबद्दल जागृकता वाढवण्यासाठी व शाश्वत दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक दुग्ध दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. गोकुळ केवळ दुग्ध व्यवसायापुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीही जपतो. आरोग्यदायी समाज घडवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, गोकुळकडून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील. यंदाचा हा उपक्रम आरोग्य संवर्धन आणि समाजसेवेचा अनोखा संगम ठरला. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी गोकुळच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.

गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, हितचिंतक यांना गोकुळ परिवाराच्यावतीने जागतिक दुग्ध दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी गोकुळचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक संभाजी पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, मार्केटिंग अधिकारी उपेंद्र चव्हाण, लक्ष्‍मण धनवडे, विक्रम कदम, विक्रम भोसले, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संतोष पाटील, प्रमोद घोडके व संघाचे व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.