स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बांबवडे येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बांबवडे येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते
शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी, अन्यायी वीज तोडणी त्वरित थांबवावी, शेतीमाला किमान हमीभाव मिळावा, प्रोत्साहन पर 50 हजाराचे अनुदान त्वरित द्यावे, भूमीअधिकरण कायदा रद्द करावा, कृषी पंपाची वीज जोडणी त्वरित थांबवावी आदी मागण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानीचे शाहूवाडी तालुका अध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, शेतकरी कामगार पक्षाचे भाई भारत पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी जयसिंग पाटील, भैय्या थोरात, रायसिंग पाटील, पद्मसिंह पाटील, अजित साळुंखे, संजय केळकर, अमर पाटील, अमोल महाजन, शामराव मिस्त्री, भीमराव नांगरे, सुयोग पाटील, गणेश निकम, दत्ता बंडगर आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
काही काळासाठी पोलिसांनी आक्रमक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले. चक्काजाम आंदोलनामुळे रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील वाहतुकीची कोंडी काही काळासाठी झाली. शाहुवाडीचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.