शरद इंजिनिअरिंगमध्ये शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

यड्राव प्रतिनिधी : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये उत्कृष्ट काम करणा-या प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले. एम्पासिस कंपनीचे इडिया कॅम्पस हेड जोशॉ डेव्हिड, संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आले.
महाविद्यालयातील प्रा. शितल उदगावे (मेकॅनिकल), प्रा. धनश्री बिरादार (इलेक्ट्रॉनिक्स), प्रा. डॉ. सुयोग पाटील (मेकॅनिकल), प्रा.डॉ. उपमा दास (आर्टीफिशल इंटेलिजेन्स अॅण्ड डाटा सायन्स) यांचा उत्कृष्ट शिक्षक तर विशाल हावले, माणिक खोत, विवेक मगदूम यांचा उत्कृष्ट सेवक म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी सर्व आदर्श शिक्षकांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. संजय खोत, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रा. एस.आर. घोरपडे, प्रा. य़ु.एस. पाटील, डिन प्रा. बाहुबली संगमे, प्रा. सुजित कुंभार, प्रा. के.ए. कुपाडे, प्रा. प्रिया घाटे, प्रा.डॉ. सुकांता देबनाथ, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या नेहा सोनी यांच्यासह विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.आर. घोरपडे यांनी केले. आभार प्रा. य़ु.एस. पाटील यांनी मानले.